भजनी मालिका
← भजनांकडे परत

हरिवांचुनी ठाव रिता कोठें आहे । विचारुनी पाहें मनामाजीं

harivanchuni thav rita kothen ahe | vicharuni pahen manamajin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
हरिवांचुनी ठाव रिता कोठें आहे । विचारुनी पाहें मनामाजीं ॥१॥ सर्व तो व्यापक भरुनि उरला । वाउगाचि चाळा वाहुं नको ॥२॥ एका जनार्दनीं भरुनि उरला । तो म्या देखियेला विटेवरी ॥३॥