भजनी मालिका
← भजनांकडे परत

हरिनाम भजन कल्लोळ जेथे सदा । नोहे तेथें बाधा विषयाची

harinam bhajan kallol jethe sada | nohe tethen badha vishayachi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
हरिनाम भजन कल्लोळ जेथे सदा । नोहे तेथें बाधा विषयाची ॥१॥ वेदशास्त्र देती ग्वाही । पुराणे तोहि बोलती ॥२॥ नामस्मरणे निरसे भेद । तुटे समुळ कंद संसार ॥३॥ निरसे भोग दुःखव्याधी । तुटे उपाधी शरीर ॥४॥ जनार्दनाचा एका म्हणे । नाम गाणें सतत ॥५॥