भजनी मालिका
← भजनांकडे परत

हरिकीर्तनालागीं प्रल्हाद गाढा । द्वंद्वाचा रगडा तेणें केला

harikirtanalagin pralhad gadha | dvandvacha ragada tenen kela

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
हरिकीर्तनालागीं प्रल्हाद गाढा । द्वंद्वाचा रगडा तेणें केला ॥१॥ कोरडिया काष्ठीं प्रगटले हरी । म्हणवोनि नृत्य करी तयापुढें ॥२॥ विणा वाहातु गातु नारदु नाचे । न कळे तयाचें महिमान ॥३॥ जनाभिमानें धरिली प्रतिष्ठा । वंचला करंटा मुक्तिसीच ॥४॥ साच अथवा लटिकें नाचतु रंगीं । अभिमान भंगी पैं होय ॥५॥ निरभिमानिया जवळीच देवो । एकाएकीं भावो जनार्दनीं ॥६॥