भजनी मालिका
← भजनांकडे परत

हरिहरांचे चिंतनीं । अखंड वदे ज्याची वाणी

hariharanche chintanin | akhand vade jyachi vani

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
हरिहरांचे चिंतनीं । अखंड वदे ज्याची वाणी ॥१॥ नर नोहे नारायण । सदा वाचे हरिहर जाण ॥२॥ पळती यमदुतांचे थाट । पडती दुर जाऊनी कपाट ॥३॥ विनोदें हरिहर म्हणतां । मोक्षप्राप्ती तयां तत्त्वतां ॥४॥ एका जनार्दनीं हरिहर । भवसिंधु उतरी पार ॥५॥