भजनी मालिका
← भजनांकडे परत

हरीचें चिंतन हरीचें हृदयीं । हरीचें चिंतन हरांचे हृदयीं

harichen chintan harichen hrudayin | harichen chintan haranche hrudayin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
हरीचें चिंतन हरीचें हृदयीं । हरीचें चिंतन हरांचे हृदयीं ॥१॥ ऐशीं परस्परें गोडी देखा । काय वर्णावें तया सुखा ॥२॥ सुख पाहता आनंद । एका जनार्दनीं परमानंद ॥३॥