भजनी मालिका
← भजनांकडे परत

हरिभजनीं घेतां गोडीं । निवारे जन्ममरण कोडी

haribhajanin ghetan godin | nivare janmamaran kodi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
हरिभजनीं घेतां गोडीं । निवारे जन्ममरण कोडी ॥१॥ भावें करितां हरीचें भजन । देवा होय समाधान ॥२॥ हरिभजनाची आवडी । काळ केला देशोधडी ॥३॥ एका जनार्दनीं भजन । भजनीं पावे समाधान ॥४॥