भजनी मालिका
← भजनांकडे परत

हमामा हुबरी खेळती एक मेळा । नानापरींचें गोपाळ मिळती सकळां

hamama hubari khelati ek mela | nanaparinchen gopal milati sakalan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
हमामा हुबरी खेळती एक मेळा । नानापरींचें गोपाळ मिळती सकळां ॥१॥ एक धावें पुढें दुजा धावे पाठीं । एक पळें एकापुढें एक सांडोनि आटी ॥२॥ ऐसें गुतलें खेळा गाई धांवती वनीं । परतेनाची कोण्हा एका जनार्दनीं ॥३॥