भजनी मालिका
← भजनांकडे परत

हमामा बाळा घालीं । नको पडों काळाचे चालीं

hamama bala ghalin | nako padon kalache chalin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
हमामा बाळा घालीं । नको पडों काळाचे चालीं ॥१॥ हमामा पोरा हमामा ॥धृ॥ हमामा घालीं बरव्यापरी । क्रोधकामा सारुनी दुरी ॥२॥ हमामा घालीं नेटें । धरीं भक्तींचे बळ मोठे ॥३॥ हमामा घालसील जरी । एका जनार्दनाचे चरण धरीं ॥४॥