भजनी मालिका
← भजनांकडे परत

गुरुपत्नीं आज्ञापिलें । तिघे इंधनासी गेले

gurupatnin adnyapilen | tighe indhanasi gele

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
गुरुपत्नीं आज्ञापिलें । तिघे इंधनासी गेले ॥१॥ घोर क्रमिती कांतार । माथां बांधोनी काष्ठभार ॥२॥ रात्र झाली सुटला वारा । मेघ वर्षे मुसळधारा ॥३॥ म्हणे चपळा गारा रिचवती । तिघे थरथरां कांपती ॥४॥ म्हणे एक जनार्दनु । मग उदया आला भानु ॥५॥