भजनी मालिका
← भजनांकडे परत

गुरुमुखें घेतां तो निर्दोष । येर्‍हर्वीं आयास पडे कष्ट

gurumukhen ghetan to nirdosh | yer‍harvin ayas pade kashta

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
गुरुमुखें घेतां तो निर्दोष । येर्‍हर्वीं आयास पडे कष्ट ॥१॥ राम कृष्न हरिमंत्र हा सोपा । उच्चारितां खेपा खंडे कर्म ॥२॥ तुटती भावना द्वैताची ते बुद्धि । निरसे उपाधि कामक्रोध ॥३॥ एका जनार्दनीं सत्य सत्य साचा । रामनाम मंत्रांचा जप करीं ॥४॥