भजनी मालिका
← भजनांकडे परत

गुरुच्या उपकारा । उत्तीर्ण नव्हे गा दातारा

guruchya upakara | uttirna navhe ga datara

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
गुरुच्या उपकारा । उत्तीर्ण नव्हे गा दातारा ॥१॥ माझें रुप मज दाविलें । दुःख सर्व हारविलें ॥२॥ तन मन धन । केलें गुरुसी अर्पण ॥३॥ एका जनार्दनीं आदर । ब्रह्मारुप चराचर ॥४॥