भजनी मालिका
← भजनांकडे परत

गुरु माता गुरु पिता । गुरु आमुची कुळदेवता

guru mata guru pita | guru amuchi kuladevata

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
गुरु माता गुरु पिता । गुरु आमुची कुळदेवता ॥१॥ थोर पडतां सांकडें । गुरु रक्षी मागें पुढें ॥२॥ काया वाचा आणि मन । गुरुचरणींच अर्पण ॥३॥ एका जनार्दनीं शरण । गुरु एक जनार्दनीं ॥४॥