भजनी मालिका
← भजनांकडे परत

गुंतलासी मायापाशी । कोण सोडवील तुजसी । धाये मोकलेनि रडसी । न ये करूणा कवणातें

guntalasi mayapashi | kon sodavil tujasi | dhaye mokaleni radasi | na ye karuna kavanaten

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
गुंतलासी मायापाशी । कोण सोडवील तुजसी । धाये मोकलेनि रडसी । न ये करूणा कवणातें ॥१॥ वाचे सदा नाम गाय । तेणें चुकती अपाय । सहजची सोय । नाम मुखीं वदतां ॥२॥ बंधनाची तुटेल बेडी । होईल कैवल्याची सहज जोडी । एका जनार्दनीं आवडी । रामनामीं धरितां ॥३॥