भजनी मालिका
← भजनांकडे परत

गोविंयेंलें देवें आम्हांसी अभिमानें । नामरुप पेणें अंतरलों

govinyenlen deven amhansi abhimanen | namarup penen antaralon

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
गोविंयेंलें देवें आम्हांसी अभिमानें । नामरुप पेणें अंतरलों ॥१॥ करिती विचार इंद्रादी देव । हें सुखवैभव न मिळे आम्हां ॥२॥ शेष उष्टावळी मिळतां आम्हांसी । पावन जन्मासी होऊं आम्ही ॥३॥ ऐसा विचार करुनियां देव । मत्स्यरुप सर्व धरिताती ॥४॥ गोपाळासी सांगे वैकुंठीचा रावो । आजी नवलावो तुम्ही करा ॥५॥ कवळ खाउनी हात टिरी पुसा । यमुनें सहसा जाऊं नका ॥६॥ कां तो सांगे हरी न कळे तयासीं । एका जनार्दनासी गुज पुसे ॥७॥