भजनी मालिका
← भजनांकडे परत

गोड तुझी ब्रीदावळी । गोड गातां नित्यकाळीं । गोड भक्त भावें बळी । तूं वनमाळी त्यापाशीं

god tujhi bridavali | god gatan nityakalin | god bhakta bhaven bali | tun vanamali tyapashin

रचनाकार: संत निळोबा · अभंग
गोड तुझी ब्रीदावळी । गोड गातां नित्यकाळीं । गोड भक्त भावें बळी । तूं वनमाळी त्यापाशीं ॥१॥ गोड तुमचीं नामें गाती । गोड कीर्तनीं उभे ठाकती । गोडा गोड तूं श्रीपती । त्याची भुक्ति मुक्ति तूंचि तूं ॥२॥ गोड त्याचे स्वानुभव । तुमच्या पायी ठेविला जीव । गोड भक्ति दृढभाव । तुमच्या चरणीं लिगटले ॥३॥ गोड त्याचें याती कुळ । गोड सत्कर्म तें सोज्वळ । गोड त्याचें बुध्दीबळ । तुज धरिलें निश्चयें ॥४॥ निळा म्हणे त्यांची मती । गोड कीर्तनीं नवी स्फूर्ती । गोड तुमची सगुण मूर्ती । ह्रदयीं त्याचे स्थिरावली ॥५॥