भजनी मालिका
← भजनांकडे परत

गोड लागें जें आपणां । तेंचि वांटीं सकळांजणां

god lagen jen apanan | tenchi vantin sakalanjanan

रचनाकार: संत निळोबा · अभंग
गोड लागें जें आपणां । तेंचि वांटीं सकळांजणां ॥१॥ पोट भरेतों पुरवी । उरलें बांधोनियां ठेवी ॥२॥ जतन आहे तुम्हासाठीं । नका धांवो बारावाटीं ॥३॥ निळा म्हणे सांगा । पाहिजे तें जीवीचें मागा ॥४॥