भजनी मालिका
← भजनांकडे परत

घटिका भरतां न लगे वेळ । उभा काल वाट पाहे

ghatika bharatan na lage vel | ubha kal vat pahe

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
घटिका भरतां न लगे वेळ । उभा काल वाट पाहे ॥१॥ कोणी न ये रे संगाती । वायां होतसे फजिती ॥२॥ माप भरतां नाहीं गुंती । वायां कुंथी फळ काय ॥३॥ शरण रिघा जनार्दनीं । मोक्षदानीं उदार ॥४॥ एका विनवी जनार्दनीं । अंतकाळीं नाहीं कोणी ॥५॥