भजनी मालिका
← भजनांकडे परत

घटामाजीं घालिजे अमृत । अथवा घालिजे खात मूत

ghatamajin ghalije amrut | athava ghalije khat mut

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
घटामाजीं घालिजे अमृत । अथवा घालिजे खात मूत ॥१॥ घट घाई करितां चूर । आकाशासी नुमटे चीर ॥२॥ घट फोडुनी केला नाश । आकाश तैसेंचि अविनाश ॥३॥ तेवीं देव नश्वर जाण । एका जनार्दनीं परिपुर्ण ॥४॥