भजनी मालिका
← भजनांकडे परत

घटघवीत वैकुंठनाथ । भक्तवत्सल शोभत

ghataghavit vaikunthanath | bhaktavatsal shobhat

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
घटघवीत वैकुंठनाथ । भक्तवत्सल शोभत ॥१॥ तयाचे पायीं माझें मन । राहो वृत्तिसह जडोन ॥२॥ नेणें आणिक दुजा छंद । वाचें आठवीन गोविंद ॥३॥ एका जनार्दनीं कटीं कर । उभा चंद्रभागे तीर ॥४॥