भजनी मालिका
← भजनांकडे परत

घारीमुखींचा पिंड अंजनीच्या करीं । पडतां निर्धारीं भक्षियला

gharimukhincha pind anjanichya karin | padatan nirdharin bhakshiyala

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
घारीमुखींचा पिंड अंजनीच्या करीं । पडतां निर्धारीं भक्षियला ॥१॥ नवमास होतां जाली ती प्रसूत । दिव्य वायुसूत प्रगटला ॥२॥ वानराचा वेष सुवर्ण कौपीन । दिसती शोभायमान कुंडलें तीं ॥३॥ जन्मतांची जेणें सूर्यातें धरियलें । इंद्रादिकां दिलें थोर मार ॥४॥ अमरपति मारी वज्रहनुवटी । पडिला कपाटीं मेरुचिया ॥५॥ वायुदेव येवोनी बाळ तो उचलिला । अवघाचि रोधिला प्राण तेथें ॥६॥ सकळ देव मिळोनी प्रसन्न पैं होतीं । वरदान देती मारुतीसी ॥७॥ सर्व देव मिळोनी अंजनीशीं बाळ । देतां प्रात:काळ होतां तेव्हां ॥८॥ तिथि पौर्णिमा चैत्रमास जाण । एका जनार्दनी रुपासी आला ॥९॥