भजनी मालिका
← भजनांकडे परत

घनाःश्याम मूर्ति नीलवर्ण गाभा । कैवल्याची शोभा शोभे बहु

ghanahshyam murti nilavarna gabha | kaivalyachi shobha shobhe bahu

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
घनाःश्याम मूर्ति नीलवर्ण गाभा । कैवल्याची शोभा शोभे बहु ॥१॥ कस्तुरी मळवट चंदनाची उटी । बाहुवटे कंठी गोरेपणें ॥२॥ एका जनार्दनीं चरणाची शोभा । अनुपम्य उभा भीमातटीं ॥३॥