भजनी मालिका
← भजनांकडे परत

घालूनियां काखे धन । सदा मागे जो कोरान्न

ghaluniyan kakhe dhan | sada mage jo koranna

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
घालूनियां काखे धन । सदा मागे जो कोरान्न ॥१॥ धन्य वायां जिणें पाही । श्वान सुकर सम तेही ॥२॥ असोनियां दरिद्रता । सदा धर्मावरी चिंता ॥३॥ द्रव्य पदरीं बहु आहे । अतिथि रिक्त हस्तें जाये ॥४॥ एका जनार्दनीं ऐसें पामर । नरक भोगिती अघोर ॥५॥