भजनी मालिका
← भजनांकडे परत

गेलों गुरुलागीं शरण । माझें हारपलें मीतुपण

gelon gurulagin sharan | majhen harapalen mitupan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
गेलों गुरुलागीं शरण । माझें हारपलें मीतुपण ॥१॥ द्वैतभाव गेला देशोधडी । बोध दिठा मज संवगडी ॥२॥ मंत्र सांगे त्रिअक्षर । परात्पर निजघर ॥३॥ जपतां मंत्र लागलें ध्यान । सहज खुटलें मीतूंपण ॥४॥ एका जनार्दनीं समाधी । सहज तुटली उपाधी ॥५॥