भजनी मालिका
← भजनांकडे परत

गायन तें सोपें गाऊं । वाचे ध्याऊं विठ्ठल

gayan ten sopen gaun | vache dhyaun viththal

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
गायन तें सोपें गाऊं । वाचे ध्याऊं विठ्ठल ॥१॥ तेणें सर्व होय सिद्धि । तुटे उपाधि जन्मजरा ॥२॥ साधनांचा न करुं श्रम । गाऊं नाम आवडीं ॥३॥ शुकादिक रंगले रंगीं । त्याची मार्गीं आम्हीं आऊं ॥४॥ एका जनार्दनीं धणीवरी । उच्चारुं हरी संतसंगें ॥५॥