भजनी मालिका
← भजनांकडे परत

गाऊनियां आल्हर मुखें । निर्जी निजवी त्या सुखें

gauniyan alhar mukhen | nirji nijavi tya sukhen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
गाऊनियां आल्हर मुखें । निर्जी निजवी त्या सुखें ॥१॥ आवडी ते नीच नवीं । वस्त्रें अळंकार लेववी ॥२॥ माझे दिठावेल झणे । उतरी वरुनी निंबलोणें ॥३॥ निळा म्हणे आई । परत कृपाळू विठाई ॥४॥