भजनी मालिका
← भजनांकडे परत

गौ आणि कन्या कथेचा विकरा । चांडाळ निर्धार पापराशी

gau ani kanya kathecha vikara | chandal nirdhar paparashi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
गौ आणि कन्या कथेचा विकरा । चांडाळ निर्धार पापराशी ॥१॥ तयाचें तें मुख न पाहती जन । अपवित्र दुर्जन पातकी तो ॥२॥ एका जनार्दनीं दोषां न परिहार । भोगिती अघोर कल्पकोटीं ॥३॥