भजनी मालिका
← भजनांकडे परत

गाती नाचती आनंदे वैष्णवजन । ते दाखवा भुवन पंढरी

gati nachati anande vaishnavajan | te dakhava bhuvan pandhari

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
गाती नाचती आनंदे वैष्णवजन । ते दाखवा भुवन पंढरी ॥१॥ आदरें येती वारकारी । नानापरी संवगडे ॥२॥ नरनारी एके ठायीं । पाहतीं वीठ्ठल रखुमाई ॥३॥ सुख अदभुत विश्रांती । एका जनार्दनीं धरा चित्ती ॥४॥