भजनी मालिका
← भजनांकडे परत

गर्जत नामाच्या कल्लोळीं । आले महीतळीं उध्दरित

garjat namachya kallolin | ale mahitalin udhdarit

रचनाकार: संत निळोबा · अभंग
गर्जत नामाच्या कल्लोळीं । आले महीतळीं उध्दरित ॥१॥ ते हे वीर वैष्णव गाढे । कळिकाळ त्यांपुढें तृणप्राय ॥२॥ वचनमात्रेंचि देती बोध । करिती अगाध सच्छिष्या ॥३॥ निळा म्हणे त्यांचिये वाणी । अमृत वोळुनी वृष्टि करी ॥४॥