भजनी मालिका
← भजनांकडे परत

गर्दभाचे अंगीं चंदनाची उटी । व्यर्थ शीण पोटीं लावूनियां

gardabhache angin chandanachi uti | vyartha shin potin lavuniyan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
गर्दभाचे अंगीं चंदनाची उटी । व्यर्थ शीण पोटीं लावूनियां ॥१॥ श्वान तो भोजनीं बैसविली अढळ । परी वोकावरी ढाळ जाऊं नेदी ॥२॥ सूकरा लेपन कस्तुरीचें केलें । परी तो लोळे चिखलां सदा ॥३॥ एका जनार्दनीं अभाविकाचे गुण । व्यर्थ शीण जाण प्राणियासी ॥४॥