भजनी मालिका
← भजनांकडे परत

गर्भवासा भीती ते अंधळे जन । मुक्तीसी कारण नाहीं आम्हां

garbhavasa bhiti te andhale jan | muktisi karan nahin amhan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
गर्भवासा भीती ते अंधळे जन । मुक्तीसी कारण नाहीं आम्हां ॥१॥ गर्भवास झालिया संतसेवा घडती । मुक्त जालिया न कळे भगवद्भक्ती ॥२॥ आम्ही सुखें गर्भवास घेऊं देखा । मुक्तिचिया मस्तकां पाय देऊं ॥३॥ एका जनार्दनीं गर्भवास सोसुं । संतांचा सोरसु हातीं लागे ॥४॥