भजनी मालिका
← भजनांकडे परत

गळे बांधले पाषाणीं । आत्मलिंग नेणें कोणी

gale bandhale pashanin | atmaling nenen koni

रचनाकार: संत रामदास · अभंग
गळे बांधले पाषाणीं । आत्मलिंग नेणें कोणी ।। जीव शिवाचें स्वरूप । कोण जाणें कैसें रूप ।। लिंग चुकले स्वयंभ । धरिला पाषाणाचा लोभ ।। रामीरामदास म्हणे । भेद जाणतीं शहाणे