भजनी मालिका
← भजनांकडे परत

गाढवासांगती सुकाळ लाथांचा । श्रम जाणिवेचा वायां जाय

gadhavasangati sukal lathancha | shram janivecha vayan jay

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
गाढवासांगती सुकाळ लाथांचा । श्रम जाणिवेचा वायां जाय ॥१॥ आम्हांसी तों एक प्रेमाचे कारण । नामाचें चिंतन विठोबाच्या ॥२॥ एका जनार्दनीं आवडी हें माझी । संतचरण पुजीं सर्वकाळ ॥३॥