भजनी मालिका
← भजनांकडे परत

एवढासा माझा भाव तो कायी । तेवढाचि तुमचिये ठेविला पायीं

evadhasa majha bhav to kayi | tevadhachi tumachiye thevila payin

रचनाकार: संत निळोबा · अभंग
एवढासा माझा भाव तो कायी । तेवढाचि तुमचिये ठेविला पायीं ॥१॥ परी तुमचें अगाध देणें । जाणवलें यावरी उदारपणें ॥२॥ एवढिसी माझी मति ते किती । तेवढीचि वाढवुनि केली सरती ॥३॥ एवढेंसे तुम्हां गाइंलें जी देवा । तेवढेंचि स्वीकारुनी तोषलेति भावा ॥४॥ एवढीशी माझी वाचा ते किती । तेवढीचि आपुलिये लाविली स्तुति ॥५॥ एवढासा निळा एवढीसी भक्ती । अपारचि तुम्ही मानिली प्रीती ॥६॥