भजनी मालिका
← भजनांकडे परत

एवढा मनींचा पुरवा हेत । पंढरीनाळा भेटवा

evadha manincha purava het | pandharinala bhetava

रचनाकार: संत निळोबा · अभंग
एवढा मनींचा पुरवा हेत । पंढरीनाळा भेटवा ॥१॥ मग मी तुमच्या न सोडीं पायां । करीन काया कुरवंडी ॥२॥ कृपासिंधु तुम्ही संत । पुरवा आर्त हें माझें ॥३॥ निळा म्हणे झालों दास । नका उदास धरुं आतां ॥४॥