भजनी मालिका
← भजनांकडे परत

एकविध वाचे नामयासी छंद । पैं नोहे भेद आन कांहीं

ekavidh vache namayasi chhand | pain nohe bhed an kanhin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
एकविध वाचे नामयासी छंद । पैं नोहे भेद आन कांहीं ॥१॥ संसारयातना दु:खाचें डोंगर । परि देवाचा विसर नाहीं मनीं ॥२॥ म्हणोनियां देव धांवे मागें मागें । सुख त्याचे संगें देवा होय ॥३॥ एका जनार्दनीं भक्त सुखासाठीं । हिंडे पाठोपाठीं देवराव ॥४॥