भजनी मालिका
← भजनांकडे परत

एकपणेंविण प्रसवला । विदेही जन्मला श्रीराम

ekapanenvin prasavala | videhi janmala shriram

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
एकपणेंविण प्रसवला । विदेही जन्मला श्रीराम ॥१॥ पूर्वी पितामहाचा पिता । तया प्रसन्न सुभानु होतां ॥२॥ यालागीं सुर्यवंशीं तंव पिता । जन्म जाला श्रीराम ॥३॥ एका जनार्दनीं श्रीराम । सर्वहरतील श्रमा ॥४॥