भजनी मालिका
← भजनांकडे परत

एकांती बैसणें शरीर रोधणें । अष्टांग साधनें श्रम नको

ekanti baisanen sharir rodhanen | ashtang sadhanen shram nako

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
एकांती बैसणें शरीर रोधणें । अष्टांग साधनें श्रम नको ॥१॥ गुदातें अंगुष्ठ लावुनी बैसणें । शरीरीं रोधणें पंचप्राण ॥२॥ नको नको व्यर्थ जीवासी यातना । रामनाम स्मरणा करी सुखें ॥३॥ एका जनार्दनीं नको यातायाती । नामस्मरणें मुक्ति सत्वर जोडे ॥४॥