भजनी मालिका
← भजनांकडे परत

एकंदर देवें आज्ञा केली । पुंडलिका दिधली निजभाक

ekandar deven adnya keli | pundalika didhali nijabhak

रचनाकार: संत निळोबा · अभंग
एकंदर देवें आज्ञा केली । पुंडलिका दिधली निजभाक ॥१॥ जे जे तुझिया क्षेत्रासी येती । त्यां त्यां उत्तम गति पाठवीं ॥२॥ उत्तम अधम न म्हणे कांही । रिगमचि नाहीं दोषा येथें ॥३॥ निळा म्हणे हे पंचकोशी । जाणा वाराणसीसमान ॥४॥