भजनी मालिका
← भजनांकडे परत

एकली एकटची होती ये सदनीं । तव आयीकिली मुरलीची ध्वनी ॥ गेले धांवोनियां पहावया लोचनीं । तंव गेलिये देहभाव विसरोनी

ekali ekatachi hoti ye sadanin | tav ayikili muralichi dhvani || gele dhanvoniyan pahavaya lochanin | tanv geliye dehabhav visaroni

रचनाकार: संत निळोबा · अभंग
एकली एकटची होती ये सदनीं । तव आयीकिली मुरलीची ध्वनी ॥ गेले धांवोनियां पहावया लोचनीं । तंव गेलिये देहभाव विसरोनी ॥१॥ हरि देखतांची मदनाचा पुतळा । गेला जडोनियां बैसला तो डोळा ॥ मनीं आठवे साजणी वेळोवेळां । नेल्या शोषुनी माझीया जीवनकळा वो ॥२॥ नव्हतें जवळी दुसरें बाई कोणी । नको जाऊं ऐसें सागावया लागुनी ॥ नेईल जीवभाव सर्व हा हरुनी । मग पडसि तूं याचेचि व्यसनीं वो ॥३॥ ऐसि जाजावोनि बोले सखियाप्रती । येरी टकमकां पाहोनि हांसती । म्हणती जाणोनियां होसि कां नेणती । भाग्यें लाधलिसी धरुनी राहें चित्तीं वो ॥४॥ आजि तुझिया भाग्यासी नाहीं पार । झाला परिचय पाहिला सारंगधर । ज्यालागी शिणति हे योगी मुनीश्वरा तोचि तुझें ह्रदयींचा परात्पर वो ॥५॥ निळा म्हणे मोडोनि वैभवा वैभव । सकळहि सुखचीच जोडली राणिव । देखिला यदुपति निजलावण्याची ठेव वो ॥६॥