भजनी मालिका
← भजनांकडे परत

एकलें न कंठचे याविण मज आतां । घेवोनि विचरेन सवें प्राणनाथा । जनी वलीं वो एकांति वसतां । न करि वेगळा हो युगें कल्प जातां वो

ekalen na kanthache yavin maj atan | ghevoni vicharen saven prananatha | jani valin vo ekanti vasatan | na kari vegala ho yugen kalpa jatan vo

रचनाकार: संत निळोबा · अभंग
एकलें न कंठचे याविण मज आतां । घेवोनि विचरेन सवें प्राणनाथा । जनी वलीं वो एकांति वसतां । न करि वेगळा हो युगें कल्प जातां वो ॥१॥ हातीं लागला वो युगादिचा निध । भाग्यें माझिया वे जोडियला सिध्द । करुनि उपचार पूजिन सावध । न वंचीं शरीर सेविन एकविध वो ॥२॥ याचिये संगतीं वो सुखाचिया कोडीं । वेचतां युगें कल्प मज वाटे घडी । भोगीन नित्य नवा जीवाचे आवडी । भरुनि निज दृष्टी पाहेन घडी घडी वो ॥३॥ अवघे निवेदिन अंतरीचे भोग । यासि करुनियां सये अंगसंग । कांही न वंचिता मन बुध्दी अंग । भोगिन निजशेजें श्रीरंग वो ॥४॥ त्यागें जीवाचिया घालीन यासि मिठी । जातां युगसंख्या कल्पाचिया कोटी । धरिन अंतरीं वो बांधोनियां गांठीं । यावरी न करि मी कदा यासि तुटी वो ॥५॥ कळे अंतरीचा भाव या परेशा । होय प्रियवादें जैसा केला तैसा । पुरवीं निजदासीं केला जो धिवसा । निळा म्हणे आहे कृपावंत ऐसा वो ॥६॥