भजनी मालिका
← भजनांकडे परत

एकादशी एकादशी । जया छंद अहर्निशी

ekadashi ekadashi | jaya chhand aharnishi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
एकादशी एकादशी । जया छंद अहर्निशी ॥१॥ व्रत करी जो नेमानें । तया वैंकुठीचें पेणें ॥२॥ नामस्मरण जाग्रण । वाचें गाये नारायण ॥३॥ तोचि भक्त सत्य साचा । एका जनार्दन म्हणे वाचा ॥४॥