भजनी मालिका
← भजनांकडे परत

एकाच्या कैवारें । कली मारिले सर्व धुरे । तयांसे ते बरे । आपणापाशीं ठेवी

ekachya kaivaren | kali marile sarva dhure | tayanse te bare | apanapashin thevi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
एकाच्या कैवारें । कली मारिले सर्व धुरे । तयांसे ते बरे । आपणापाशीं ठेवी ॥१॥ ऐसा कृपावंत स्नेहाळ । भरलें कीर्ति भूमंडळ तया स्मरे हळाहळ । निशीदिनीं ॥२॥ भक्ति भावचेनि प्रेमें द्वारपाळ जाहला समें । अद्यापि तिष्ठे नेमें । वचन तें नुल्लुमीं ॥३॥ अंकितपणे तिष्ठत उभा । एका जनार्दनीं धन्य शोभा । पुडंलिकाच्या लोभा । युगें अठ्ठावीस ॥४॥