भजनी मालिका
← भजनांकडे परत

एकाची काजें फीटलें सांकडें । उगाविलें कोंडे बहुतांची

ekachi kajen phitalen sankaden | ugavilen konde bahutanchi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
एकाची काजें फीटलें सांकडें । उगाविलें कोंडे बहुतांची ॥१॥ तोचि हरी उभा चंद्रभागें तटीं । कर ठेउनी कटीं अवलोकित ॥२॥ पडतां संकआट धांवतसे मागें । गोपाळांचिया संगें काला करी ॥३॥ चोरुनी शिदोरी खाय वनमाळी । प्रेमाचे कल्लोळीं आनंदाचेम ॥४॥ यज्ञ अवदानीं करी वांकडें तोंड । लोणी चोरितां भांड गौळणी म्हणती ॥५॥ एका जनार्दनीं ठेवणें संतांचे । उभें तेंसांचें विटेवरी ॥६॥