भजनी मालिका
← भजनांकडे परत

एक ध्याती एकामेंकीं । वेगळें अंतर नोहे देखा

ek dhyati ekamenkin | vegalen antar nohe dekha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
एक ध्याती एकामेंकीं । वेगळें अंतर नोहे देखा ॥१॥ ऐसी परस्परें आवडी । गुळ सांडुनी वेगळी नोहे गोडी ॥२॥ एकमेकांतें वर्णिती । एकमेकांतें वंदिती ॥३॥ एका जनार्दनीं साचार । सर्वभावें भुजा हरिहर ॥४॥