भजनी मालिका
← भजनांकडे परत

दुस्तर मार्ग आटाआटी । पंढरी सृष्ती तारक

dustar marga ataati | pandhari srushti tarak

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
दुस्तर मार्ग आटाआटी । पंढरी सृष्ती तारक ॥१॥ कोणा न लगे दंडन । कायापीडन कष्ट ते ॥२॥ नको उपवास विधीचा पडदा । शुद्ध अशुद्धा न पहावें ॥३॥ मुगुटमणीं पुंडलीक । दरुशनें पातक हरतसे ॥४॥ एका जनर्दनीं निर्मळ । पंढरी स्थळ सर्वांसी ॥५॥