भजनी मालिका
← भजनांकडे परत

दुर्लभ नर जन्म भाग्योदय वेळ

durlabh nar janma bhagyoday vel

रचनाकार: संत जनार्दन · अभंग
दुर्लभ नर जन्म भाग्योदय वेळ । जिंकुनी कळी काळ व्हावे मुक्त ॥१॥ प्राप्तवेळे जना बुडाले डोहळे । पुन्हा हा न मिळे कांही केल्या ॥२॥ वेष दंभ ज्ञान सकळांसी मान्य । म्हणती शरण होऊ तया ॥३॥ त्यागोनि हेंमौढ्य मनें सावधान । करावेम नित्य श्रवण गुरुशास्त्र ॥४॥ करोनि मनन तेंचि आचरावें । सदुरुप्ती व्हावे शरण भावें ॥५॥ करो कांही आज्ञा तैसेची करावें । तेंचि करवावें सकळां कडोनि ॥६॥ वाद भेद वर्म त्यागोनिया अन्य । व्हावे पैं शरण योगी यासी ॥७॥ म्हणे जनार्दन घावो नये होटी । उघडी भ्रमताटी एकनाथ ॥८॥