भजनी मालिका
← भजनांकडे परत

द्रव्याचिया लोभें । तीर्थामध्यें राहती उभे

dravyachiya lobhen | tirthamadhyen rahati ubhe

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
द्रव्याचिया लोभें । तीर्थामध्यें राहती उभे ॥१॥ सांगती संकल्प ब्राह्मण । तेणें निर्फण तीर्थ जाण ॥२॥ संकल्पानें नाड । उभयतां ते द्वाड ॥३॥ संकल्पाविरहित धन । एका जनार्दनीं पावन ॥४॥