भजनी मालिका
← भजनांकडे परत

दोष वसे पात्रांतरीं । आत्मा निर्मल चराचरीं

dosh vase patrantarin | atma nirmal characharin

रचनाकार: संत निळोबा · अभंग
दोष वसे पात्रांतरीं । आत्मा निर्मल चराचरीं ॥१॥ सर्पामुखीं वसे विष । मधुमक्षिके सारांश रस ॥२॥ स्वातिजळें मुक्ताफळ । शुक्तीं सपीं हाळाहळ ॥३॥ निळा म्हणे उपाधिभेदें । दावित निवाड शुध्दाशुध्दें ॥४॥