भजनी मालिका
← भजनांकडे परत

दोरा अंगीं जैसा नसतां सर्प दिसे । मिथ्या देह तैसा वस्तूवरी आभासे

dora angin jaisa nasatan sarpa dise | mithya deh taisa vastuvari abhase

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
दोरा अंगीं जैसा नसतां सर्प दिसे । मिथ्या देह तैसा वस्तूवरी आभासे ॥१॥ देह मी नव्हे देह मी नव्हे । देह मी नव्हे माझेनी अनुभवें ॥२॥ घटीं वर्तूळ आकाश परि तें महदाकाश । विकारवंत देह चैतन्य विलास ॥३॥ एका जनार्दनीं दो नांवीं एक । देह झाला मेला समूळ मिथ्या देखा ॥४॥