भजनी मालिका
← भजनांकडे परत

दोन्ही डोळां अवलोकितां । धणी न पुरे पंढरीनाथा

donhi dolan avalokitan | dhani na pure pandharinatha

रचनाकार: संत निळोबा · अभंग
दोन्ही डोळां अवलोकितां । धणी न पुरे पंढरीनाथा ॥१॥ चित्त वेधलें चिंतनें । मनहि तदाकारध्यानें ॥२॥ वाचा कुंठित राहिली । बुध्दिहि निमग्मचि ठेली ॥३॥ निळा म्हणे अवघींच अंगें । रंगली त्याची विठ्ठल रंगें ॥४॥